२०१३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र वर्ष', म्हणून साजरं केलं जातंय. आपल्यापैकी बहुतेक जण हे गणित / संख्याशास्त्र म्हटलं की "भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर", याची आठवण होणारे. पण या संख्यांशी मैत्री झाली की संभव - असंभवतेची गणितं उलगडायला लागतात आणि मग अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर १९४७ सालची एक घटना आठवतेय; तीसुद्धा आपल्या भारतातच घडलेली. फाळणीमुळे देशातील वातावरण तंग होतं. दिल्लीतला लाल किल्ला निर्वासितांनी व्यापला होता. त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट सरकारनं एका कंत्राटदाराला दिलं होतं. पण किल्ल्यात नेमके किती लोक आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हतं. शिवाय परिस्थिती स्फोटक असल्यानं प्रत्यक्ष आत जाऊन मोजणी करणं अशक्य होतं. साहजिकच कंत्राटदारानं भरमसाठ रकमेचं बिल दिलं. त्या वेळी जे. एम. सेनगुप्ता नावाच्या एका संख्याशास्त्रज्ञानं एक क्लृप्ती लढवली. सगळ्या अन्नपदार्थांमध्ये मीठ हे सगळ्यात स्वस्त होतं. त्यामुळे वापरल्या गेलेल्या मिठाचं प्रमाण वाढवून दाखवून कंत्राटदाराच्या फायद्यात फारशी वाढ होणार नव्हती. त्यामुळे कंत्राटदारानं वापरलेल्या मिठाचं प्रमाण आणि सामान्यपणे आहारात वापरल्या जाणाऱ्या मिठाचं दरमाणशी प्रमाण, यांचा वापर करून सेनगुप्ता यांनी संख्याशास्त्राच्या मदतीनं लाल किल्ल्यातल्या निर्वासितांच्या संख्येचा अंदाज बांधला. दिल्लीतल्याच दुसऱ्या एका छोट्या छावणीतल्या निर्वासितांची प्रत्यक्ष गणना करून ही पद्धत उत्तमरीतीने काम करत असल्याचं सिद्ध झालं.
अशा या संख्याशास्त्रातील
Jacob Bernoulli या महान शास्त्रज्ञाने लिहिलेल्या "Ars Conjectandi" या मूलभूत निबंधाच्या प्रकाशनास यंदा ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर अनेकविध क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या Bayesच्या प्रमेयाचा शोध लागूनही यंदा २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं जगभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. सर्वसामान्य जनता आणि संख्याशास्त्र यांच्यातील दरी कमी व्हावी म्हणूनही काही खास प्रयत्न केले जात आहेत. तुम्हालाही या दुनियेची सफर करायची असेल तर www.statistics2013.org या संकेतस्थळास अवश्य भेट द्या. तेथेच आपल्याला दैनंदिन जीवनात कुठे - कुठे संख्याशास्त्र भेटू शकतं यासंबंधी SAS या कंपनीनं बनवलेला छोटासा व्हिडीओ देखील बघायला मिळेल. आणि संख्यांना कशा निरनिराळ्या प्रकारे कामाला लावता येऊ शकतं हे आपल्या मायबोलीत ऐकायचं असेल तर पुणे विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल गोरे यांनी रचलेलं गीत ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
This comment has been removed by the author.
ReplyDelete